30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरधर्म संस्कृती‘द केरळ स्टोरी' चित्रपटातून होणार आणखी 'फाइल' उघड

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातून होणार आणखी ‘फाइल’ उघड

Google News Follow

Related

काश्मिरी पंडितांच्या विस्थापन आणि दुःखावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या यशानंतर अशा अनेक चित्रपटांची चर्चा होत आहे. यामध्ये आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे. निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरवरून लक्षात येते की केरळ राज्य आणि देशाविरोधात रचले जात असलेल्या एका मोठ्या कटाचा या चित्रपटात पर्दाफाश होणार आहे.

या चित्रपटाचा टीझर त्यांनी यूट्यूबवर अपलोड केला आहे. केरळमध्ये हजारो महिला लव्ह जिहादसह ​​मानवी तस्करीच्या बळी ठरल्याचा दावा शाह यांनी केला आहे. तर गेल्या बारा वर्षांत केरळ राज्यातून 32 हजार मुली गायब झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

केरळमधून लव्ह जिहादसाठी ISIS आणि जगातील इतर युद्धग्रस्त भागात पाठवण्यासाठी हजारो महिलांची शिकार केली जात असल्याचे टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. टीझरच्या सुरुवातीलाच एक प्रश्न विचारण्यात आला आहे. यामध्ये प्रेक्षकांना विचारण्यात आले आहे की, जर तुमची मुलगी मध्यरात्रीपर्यंत घरी आली नाही तर तुम्हाला कसे वाटेल. यानंतर बारा वर्षांत केरळमधून तब्बल ३२ हजार मुली बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्या मुली आजपर्यंत परत आलेल्या नाहीत.

हे ही वाचा:

हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले

…आणि भारताने गाठले चार अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य

कोल्हापुरात भाजपाने केले शक्तिप्रदर्शन

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

या टिझर मध्ये २००६ ते २०११ या काळात असलेले माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांनी दिलेला एक इशाराही यामध्ये आहे.ते म्हणाले, “पॉप्युलर फ्रंटला केरळला इस्लामिक राज्य बनवायचे आहे. ” ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही सुदिप्ता सेन यांनी केले आहे. या चित्रपटामधून ISIS या दहशतवादी संघटनेचा एक महत्त्वाचा कट समोर येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा