ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा

ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा

“ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा पुराव्यासह सोमवारी मुंबई येथे पत्रकार परिषदेत उघड/खुलासा करणार.” असं ट्विट करत भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी ठाकरे सरकारच्या सगळ्या मंत्र्यांचा ‘विकेंड’ खराब केला आहे.

किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

किरीट सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात २४ हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पानं आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही घेरलं. उत्तर आणि प्रत्युत्तर द्यायला हा काय मुशायरा नाहीये. ठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली. त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश आहे. एखादा कुठला तरी निकाल आला की काही मंत्र्यांना चार दिन की चांदनी असं वाटतं. पाच- पंधरा दिवस त्यांना शेरोशायरी करू द्या, असा चिमटा सोमय्या यांनी काढला.

हे ही वाचा:

जेव्हा ‘हम करे सो कायदा’ या चालतो तेव्हा ‘कायद्याचे राज्य’ उरत नाही

कायद्याचा धाक राहिलेला नाही, सरकार केवळ नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे

साकीनाका बलात्कार पीडितेची झुंज अपयशी

‘केरळ मॉडेल’ पुन्हा पहिल्या क्रमांकावर

ज्या कारणामुळे सुप्रीम कोर्टाने तुरुंगात डांबलं ती केस प्रकरण अजूनही सुरूच आहे. छगन भुजबळ यांना एवढेच सांगायचे की उड्या मारू नका. १२० कोटी रुपये रोख दिले गेले आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे नव्हते तर कुठल्या नवनाथ घोटाळाचे होते का ते सांगा, असा सवाल त्यांनी केला आहे.

Exit mobile version