सचिन वाझे प्रकरणात दुसरी मर्सिडीज एनआयएच्या हाती

सचिन वाझे प्रकरणात दुसरी मर्सिडीज एनआयएच्या हाती

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या खटल्यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. या प्रकरणात एनआयएने यापूर्वीच एक मर्सिडीज गाडी देखील ताब्यात घेतली आहे. आता दुसरी मर्सिडीजदेखील एनआयएने ताब्यात घेतली आहे.

मनसुख हिरेन यांची गाडी बिघडल्यानंतर तो एका कॅबमधून क्रॉफर्ड मार्केट येथे गेला. तिथे मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची याच काळ्या मर्सिडीजमध्ये भेट झाली होती. ही गाडी सचिन वाझेच वापरत होता. परंतु जेव्हा एनआयएच्या टीमला ही गाडी जेव्हा पोलिस मुख्यालयात मिळाली तेव्हा या गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. यापुर्वी देखीव वाझे याने गाड्यांची नंबर प्लेट बदलली आहे. आता अजून एक मर्सिडीज गाडी समोर आली आहे. ही गाडी देखील सचिन वाझेच वापरत होते, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणात सापडलेली ही चौथी संशयास्पद गाडी आहे.

हे ही वाचा:

मथुरा, काशी आणि घुबडांचे चित्कार

सत्तेसाठी आणखीन किती लोकांना वाचवणार उद्धवजी? फडणवीस यांचा सवाल

जयंत पाटील म्हणतात, वाझे प्रकरणावर चर्चाच नाही

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली एक स्कॉर्पिओ गाडी उभी होती. यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने करायला सुरूवात केली. त्यावेळी या गाडीच्या प्रकरणाचे धागेदोरे खुद्द मुंबईतील क्राईम ब्रांचची शाखा असलेल्या सीआययुचे प्रमुख अधिकारी सचिन वाझे यांच्याशी जुळलेले आढळले. त्यामुळे सचिन वाझे यांना देखील अटक करण्यात आली होती.

Exit mobile version