उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय राऊत यांचा पत्ता कट झाल्याने आता शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह आल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्यांची महत्त्वाची पदं संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या प्रमाणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठं धक्का उद्धव ठाकरे गटाला दिले असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत राज्यसभेतील मुख्य नेतेपदी गजानन कीर्तिकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘२१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथे शिवसेना कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात संजय राऊत येथून पुढे संसदेतील शिवसेना पक्षाचे नेते नसतील असा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यांच्या जागी गजानन कीर्तीकर यांची या पदावर निवड केली जावी. आमच्याकडे बहुमत असल्याने, संजय राऊत यांना या पदावरून दूर केले जावे.’ असे पत्र शिवसेना संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवले होते. त्यामुळे पक्ष, निवडणूक चिन्ह आणि महत्वाचे पदही जाणार हे निश्चित झाले होते. गुरुवारी हा निर्णय वास्तवात आला आहे. कीर्तिकारांच्या नियुक्तीमुळे ठाकरे गटाला मोठा हादरा असल्याचे म्हटल्या जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी नियुक्ती केली होती. त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र त्यांनी लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पाठवले होते. राज्यातील सत्तांतराचा नाट्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सतत वादाच्या ठिणग्या उडत आहेत. संजय राऊतही सातत्याने टीका करत आहेत. या आता संजय राऊत कट करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये
आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
गजानन कीर्तीकर १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ सदस्य असलेल्या कीर्तीकर यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वायव्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे तत्कालीन खासदार गुरुदास कामत ह्यांचा १.८३ लाख मताधिक्याने पराभव केला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर कीर्तिकर यांनी शिवबंधन तोडले आणि शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले. परंतु त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच राहणे पसंत केले आहे.