पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु झालेला आहे. यातच तृणमूल काँग्रेसला अजून एक मोठा धक्का लागला आहे. सिसीर अधिकारी हे कांठी दक्षिणचे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. सिसीर अधिकारी यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. याशिवाय २४ मार्चला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीलाही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ममता बॅनर्जींच्या नंतर तृणमूलचे सर्वात मोठे नेते मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी गेल्या वर्षी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर अधिकारी आणि ममता यांच्यातील संबंध विकोपाला गेले. ममतांनी सुवेंदू अधिकारींना गद्दार ठरवले होते. आता ममता बॅनर्जी सुवेंदूंच्या विरुद्ध नंदिग्राममधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ममता आणि अधिकारींमधले शत्रुत्वही झाकून राहिलेले नाही. सुवेंदूंचे वडील आणि तृणमूलच्या खासदार सिसीर अधिकारी यांनीही आता नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा:
राजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?
दिल्लीत फडणवीस, मोदी, शाह यांची बैठक
लवकरच टोलमुक्ती होणार-नितीन गडकरी
सचिन वाझेंनी वापरलेला सदरा एनआयएच्या ताब्यात
२४ मार्चला नरेंद्र मोदींची बंगालमध्ये प्रचार सभा होणार आहे. या सभेतही सिसीर अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, मी माझ्या मुलाच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले. भाजपाकडून बोलावल्यास मोदींच्या सभेला जाईन असेही ते म्हणाले. त्यामुळे आता लवकरच सिसीर अधिकारीही राजीनामा देणार का? असाप्रश्न उपस्थित होत आहे.