डाव्यांच्या ‘खेळाचा’ अजून एक भारतीय बळी

डाव्यांच्या ‘खेळाचा’ अजून एक भारतीय बळी

इंग्लंडची प्रतिष्ठीत शिक्षण संस्था ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीमध्ये रश्मी सामंत नावाची एक भारतीय मुलगी पहिल्यांदाच स्टुडंट्स युनियनची अध्यक्ष झाली. परंतु ऑक्सफर्डमधील डाव्या विद्यार्थ्यांनी या मुलीला काही दिवसातच राजीनामा द्यायला भाग पाडलं. काय कारण होतं? भारतीय मुलीने काय चूक केली होती? का केवळ एका विचारधारेच्या आखून दिलेल्या भाषेच्या बाहेर जाऊन बोलल्यामुळे राजीनामा दिला गेला?

भारतासकट सर्वच लोकशाही असलेल्या देशांमधील शिक्षण संस्थांवर डाव्या विचारांच्या ‘बुद्धिजीवींचा’ प्रभाव असल्याचे आपण वाचले असेलच. परंतु कदाचित भारतातूनही जास्त पकड ही पश्चिमी देशातील शिक्षण संस्थांमध्ये डाव्या विचाराची दिसून येते. यातीलच एक प्रतिष्ठीत युनिव्हर्सिटी म्हणजे ऑक्सफर्ड. भारतातील उडूपीमधून शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेली ही २२ वर्षीय तरुणी ऑक्सफर्ड विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा म्हणून निवडली गेली. परंतु २०१७ मध्ये रश्मीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोवर आणि फोटोखाली लिहिलेल्या मजकुरावर आक्षेप घेत या मुलीला राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. ही काय पोस्ट होती नेमकी?

मलेशियामध्ये काढलेल्या एका फोटोखाली रश्मीने ‘चिंग चँग’ असे लिहिले होते. असे लिहिणे हे डाव्या विचारसरणीच्या अनुसार ‘रेसिस्ट’ असल्यामुळे ऑक्सफर्डमधील डाव्यांनी रश्मीवर राजीनामा देण्याचा दबाव आणला. परिणामी काही दिवसातच रश्मीला राजीनामा द्यावा लागला. माध्यमांशी बोलताना रश्मीने यावर उत्तरही दिले होते, की,”माझी मातृभाषा इंग्रजी नाही. तरीही मी शब्दांची कोटी करण्याचा एक प्रयत्न केला होता, यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.” ही गोष्ट देखील इथे नमूद करणे गरजेचे आहे की जेंव्हा रश्मीने ही ‘रेसिस्ट’ पोस्ट शेअर केली तेंव्हा ती केवळ १८ वर्षांची होती.

हे ही वाचा:

https://www.newsdanka.com/international/canada-thanks-india-for-vaccine/7675/

https://www.newsdanka.com/international/almost-all-women-in-britain-faced-sexual-assault-un-report/7663/

https://www.newsdanka.com/international/india-to-get-weaponized-drones/7649/

https://www.newsdanka.com/international/modi-biden-meet-finalised/7586/

https://www.newsdanka.com/international/pm-modi-discusses-various-issues-with-his-japanese-counterpart/7563/

रश्मी सामंत ही पहिली भारतीय होती, जी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष म्हणून निवडली गेली होती. परंतु डाव्यांच्या खेळामुळे तिला काहीच दिवसात हा मान सोडावा लागला.

Exit mobile version