यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रियंका मौर्या यांच्यानंतर काँग्रेसची आणखी एक महिला कार्यकर्तीने काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे.
पोस्टर गर्ल वंदना सिंह यांनीही काँग्रेस पक्ष सोडला आहे. वंदना सिंह महिला काँग्रेस यूपी सेंट्रलच्या उपाध्यक्षा होत्या. पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वंदना ही काँग्रेसची पोस्टर गर्ल होती आणि अशा स्थितीत त्यांचे जाणे पक्षाचे मोठे नुकसान मानले जात आहे. त्यांच्या आधी काँग्रेसची आणखी एक पोस्टर गर्ल प्रियंका मौर्य यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
वंदना सिंह यांनी काँग्रेस पक्ष का सोडला?
काँग्रेस सोडल्यानंतर वंदना सिंह म्हणाल्या की, मी पाच वर्षांपासून काँग्रेस पक्षाची सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहे. मी विधानसभेच्या दोन जागांवर तिकीट मागितले होते, पण पक्षात कष्टाळू आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रियंका गांधींना भेटण्याची संधीही मिळत नाही. यामुळे दुखावले जाऊन मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
अरुणाचलमध्ये हिमस्खलनात अडकलेले सात जवान शहिद
संजय राऊत हे छळ होत असल्याची आवई उठवत आहेत!
वंदना सिंह यांच्या आधी ‘लडकी हू लड सकती हू’ या घोषणेची मुख्य पोस्टर गर्ल प्रियंका मौर्यानेही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रियंका गांधी आणि पक्षावर अनेक गंभीर आरोपही केले होते आणि त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यामध्ये राज्यातील ११ जिल्ह्यांतील ५८ जागांवर मतदान होणार आहे. यूपी विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्चला लागणार आहे.