राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा

राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एका महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने इचलकरंजी या नगरपालिकेच्या दर्जात वाढ करून महापालिकेचा दर्जा दिला आहे. यासंबंधीची घोषणा गुरुवार, ५ मे रोजी नगरविकास विभागाकडून करण्यात आली.

इचलकरंजी महापालिका होण्याचा मार्ग गुरुवारी मोकळा झाला आहे. कोणतीही हद्दवाढ न होता महापालिका होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. सरकारकडून तसा जीआर काढण्यात आला आहे. या महापालिकेसाठी जास्तीचा निधी दिला जाणार आहे.

राज्यातील श्रीमंत नगरपालिका अशी इचलकरंजी नगरपालिकेची ओळख आहे. नगरपालिकेच्या शेवटच्या सभागृहात या नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा मिळावा असा ठराव करण्यात आला होता. त्यासाठी सर्व पक्षांनी मान्यता दिली होती. तसेच जनतेच्या मागणीचा खासदार धैर्यशील माने हे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्‍मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार

‘कोरोना संपताच CAA लागू होणार’

२०२४ साली इस्रो करणार ‘शुक्र’ मोहीम

एलआयसी आयपीओ शेअर्सवर उड्या!

इचलकरंजी ही राज्यातील २८ वी महापालिका असणार आहे. गेली सहा वर्षे एकही महापालिका जाहीर करण्यात आली नव्हती.

Exit mobile version