महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दणक्यात कार्यक्रम पार पडला. त्यात एक वर्षभरापूर्वी केलेल्या धाडसामुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. या धाडसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आशीर्वाद तसेच देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ लाभले त्याबद्दल त्यांचे आभार मुख्यमंत्र्यांनी मानले.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्या कोविडच्या काळात फडणवीसांच्या काळातील योजना बंद केल्या. हे सगळे केल्यावर लोकांचे जगणे असह्य झाले. शिवसेना व शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं. म्हणून शिवसेना वाचविण्यासाठी, खच्चीकरण थांबविण्यासाठी धाडस करावं लागलं. धाडस सोपं नव्हतं. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं शिवसैनिकांच्या आमदारांच्या मनातलं घडत होतं. मनात जे विचार होते. उद्रेक होता त्याला वाचा फोडली. जनतेने ते पाहिलं. सरकार स्थापन झाल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.
मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व समाजघटकांना न्याय देण्याचं काम केलं. मी आणि देवेंद्र फडणवीस असे दोघेच सुरुवातीला होतो. पण पहिल्या दिवसापासून कॅबिनेटचे निर्णय पाहिले तर लोकहिताचे निर्णय घेतले. काही लोक आपल्या पाठीशी अगदी मनापासून होते. काही लोकांना शंका होती. ५० लोकांचं काय होणार, माझ्या राजकीय जीवनात मागचा पुढचा विचार न करता धाडसाने निर्णय घेतला. बाळासाहेबांचे आशीर्वाद , दिघेसाहेबांची प्रेरणा होती. मला माहीत नव्हतं मुख्यमंत्री होईन. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेल्यावर मोदी आणि अणित शहांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली त्यांचे धन्यवाद. खास करून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. एकनाथ शिंदेंनी जे धाडस केले त्याच्या पाठीशी फडणवीस आणि त्यांची टीम उभी राहिली, त्याबद्दल धन्यवाद.
हे ही वाचा:
ड्रोनच्या किमतीवरून वाद घालणाऱ्यांनी सत्य तर जाणून घ्या!
सत्ता गेल्यानंतर टाळाच्या गजरात रंगले आदित्य ठाकरे
तरुणाच्या हत्येनंतर सलग तीन दिवस फ्रान्स पेटलेला
अमेरिकेतील कॉलेजांमधील आरक्षण बंद
या राज्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. ऐतिहासिक निर्णय घतले. कधीच असे निर्णय घेतले नव्हते.
सर्वांना न्याय मिळवून देणारे सरकार हवे होते. २०१९ ला शिवसेना भाजपा युती घोषित झाली निवडणूका लढविली विचार घेऊन पुढे चाललो. एका बाजुला मोदींचे विचार आपण घराघरात जाऊन मते मागितली. सरकार पुन्हा येणार पण बहुमतही मिळालं, पण दुर्दैवाने निवडणूक निकाल घोषित झाले तसे काही खुलासे बाहेर येऊ लागले. मीडियात भाष्य होऊ लागली. आणि ज्यांच्या मनात काळबेरं होतं ते आमच्यासाठी सगळे दरवाजे उघडे आहेत, असे म्हणू लागले. सरकार युतीचं व्हावं असं लोकांच्या मनात होतं, पण लोकांना नको होतं ते झाले.