लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला आहे. मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे. या पुतळ्याचे आज, १४ सेप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे.
रशियाकडून तिसऱ्या भारतीय व्यक्तीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. भारतातील तीन व्यक्तींचे रशियात पुतळे असल्याचे पाहून रशियाने भारतीय संस्कृती जपल्याचा गर्व वाटत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. महाराष्ट्र आणि भारतातील दलित, वंचित वर्गातील व्यक्तीचा रशियासारख्या राष्ट्राकडून गौरव होत आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून दलित, मजूरांची, पीडितांची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठे यांनी केला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी दिल्याबद्दल फडणवीसांनी आभार मानले आहेत.
अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे आयुष्यात एकदाच शाळेत गेले. २२७ किमी चालून ते पुण्यात आले होते. शिक्षण नसतानाही त्यांनी पुस्तके, कथा पोवाडे लिहले. तसेच त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले आहेत. भारतीय स्वतंत्रता संग्राममध्ये आणि गोव्याच्या मुक्ती संग्राममध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते, असे फडणवीस म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
आमदार बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
फॉक्सकॉन प्रकरणी नव्या सरकारवर टीका कशाला?
आरोग्य विभागाची नावे हिंदीसह उर्दूमध्ये लिहण्यास सांगणारा अधिकारी निलंबित
महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई
दरम्यान, रशियाने महाराष्ट्रभूमीचे महान पुत्र साहित्यरत्न अण्णा साठे यांच्या साहित्याचा कतृत्वाचा गौरव केला आहे. तसेच भारत रशिया संबधांच्या दृढीकरणाच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी रशियात त्यांचा पुतळा उभारला आहे. हा पुतळा मॉस्को येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने अण्णाभाऊंचा अर्धाकृती पुतळा मॉस्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींच्यासोबत बसविला आहे.