ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी तीन केंद्रीय कृषी कायद्याविरूद्ध आपले उपोषण रद्द केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आज आपला निर्णय जाहीर केला.
ज्येष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारेजी यांची आज राळेगणसिद्धी येथे केंद्रीय मंत्री श्री कैलाश चौधरीजी यांच्यासमवेत भेट घेतली. केंद्र सरकारच्या विनंतीचा मान राखत त्यांनी आपले उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे.#AnnaHazare @KailashBaytu pic.twitter.com/0Lj8KPoM3T
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2021
“मी अनेक वर्षांपासून मुद्द्यांवरून आंदोलन करत आहे. शांततेने निषेध करणे हा गुन्हा नाही. मी तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्त्या करावी लागते कारण त्यांना त्यांच्या उत्पन्नाचे उचित मूल्य मिळत नाही. त्यांच्या पिकांना योग्य दर मिळावा यासाठी सरकारने हमीभाव ५० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मला संदर्भात पत्रदेखील देण्यात आले आहे.” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा उच्चस्तरिय समितीचे गठन होते आहे.यापूर्वी मा. अण्णा हजारेजी यांनी केलेल्या मागण्या आणि त्या पूर्ण केल्यासंबंधीचा अहवाल सुद्धा यावेळी त्यांना सादर केला.
मा.अण्णा हजारेजी यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो.#AnnaHazare pic.twitter.com/DaSmyAofJp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2021
ते म्हणाले, “केंद्राने या १५ मुद्द्यांवर (अण्णा हजारेंच्या मागणीमध्ये असलेले मुद्दे) काम करण्याचे ठरवले असल्याने मी उद्याचे उपोषण रद्द केले आहे.”
या महिन्याच्या सुरूवातीस,-83 वर्षीय अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जानेवारी अखेरीस आपल्या आयुष्यातील “शेवटचे उपोषण” सुरू करणार असल्याचे म्हटले होते.
राष्ट्रीय राजधानीच्या जवळ हजारो शेतकरी अनेक आठवड्यांपासून आंदोलन करत आहेत, ते आंदोलक “लोकशाही मूल्ये” पाळत नसल्याचे अण्णांनी पत्रकारांना सांगितले.