ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. लोकायुक्ताच्या मुद्यावरून अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होतं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नसल्याचे अण्णा हजारे म्हणाले.
लोकायुक्त कायदा न झाल्यास आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असेही अण्णा हजारे म्हणाले आहेत. लोकायुक्त कायदा तयार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सत्ता कार्यकाळात आश्वासन दिले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारनेदेखील लोकायुक्त कायदा तयार करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. आता अडीच वर्षे उलटून गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यावर काहीही बोलत नसल्याचे अण्णा हजारे म्हणाले.
या संदर्भात सात बैठका पार पडल्या आहेत तरीही मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. पुढचं काहीही कळायला मार्ग नाही त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज आहे, असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
माणिक सहांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा विसर
केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी
‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही अण्णा हजारे यांनी टीका केली. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दोन राज्यात सत्ता आली. तरीही त्या राज्यात लोकायुक्त कायदा तयार करण्यात आला नाही, याचे दु:ख वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.