महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. राज्यात बार उघडे राहू शकतात मग मंदिरे का नाहीत? असा सवाल अण्णा हजारे यांनी विचारला आहे. दरम्यान अण्णा हजारे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तर तसे न झाल्यास सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही हजारे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमावलीच्या नावाखाली ठाकरे सरकारने राज्याला लॉकडाउनच्या फेऱ्यात अडकवले. या नंतर नियमात शिथिलता आणताना सत्ताधाऱ्यांचे राजकीय कार्यक्रम राजरोज होताना दिसत होते. तर हॉटेल, मद्यालय आणि इतर व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यात आले. पण राज्यातील मंदिरे उघडण्यावर प्रतिबंध घालून देवांना मात्र बंदिस्त ठेवले गेले.
हे ही वाचा:
राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत
काबुल विमानतळावर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला
ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन
२०५० मध्ये मुंबई बुडणार? मंत्रालय, नरिमन पॉइंट जाणार पाण्याखाली
ठाकरे सरकारच्या या कारभार विरोधात कायमच जनतेतून रोष ऐकू येत होता. तर महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून या गोष्टी वरून सरकार विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. तर त्याच सूरात आता अण्णा हजारे हे देखील सूर मिसळताना दिसत आहेत \.
सोमवारी भाजपाचे आंदोलन
राज्यातील मंदिरे उघडली जावीत या मागणीवरून भारतीय जनता पार्टीने सोमवार, ३० ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन केले जाणार आहे.