27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामाअनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल

अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल

Google News Follow

Related

परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण आधी अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगितलं होतं. त्याशिवाय परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या असल्याचे वृत्त आहे.

या धाडीत ईडीच्या हाती काय कागदपत्रे लागली याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. त्यानंतर आता अनिल परब यांना आणखी एक धक्का बसला आहे. परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २ सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

काल पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “मी चार महिन्यापूर्वी राज्यपालांकडे तक्रार केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमने अनेक घोटाळे केले आहेत. त्यापैकी एक हा घोटाळा आहे. राज्यपालांनी लोकायुक्तांना त्याची चौकशी करण्यास सांगितलं होतं. आता चौकशी सुरू होत आहे. नवीन लोकायुक्त आलेले आहेत. परवा पासून चौकशी होणार आहे. परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे हा अनिल परबांचा सचिन वाझे आहे. त्याच्या द्वारे एका एका बदलीसाठी २५ लाखांपासून सव्वा कोटीपर्यंत वसूल केले. त्यामुळे ईडीने काल बजरंग खरमाटे यांच्या वास्तूंवर धाडी टाकल्या. किती शोरुम, किती फ्लॅट, किती बंगलो, इतकी संपत्ती आली कुठून? अनिल परबांची संपत्तीही आपण पाहात आहात. हा पैसा कुठून आणला? सचिन वाझेकडून की या बदल्यांमधून?” असा सवाल सोमय्यांनी केला.

हे ही वाचा:

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

या घोटाळेबाजांना आता जेलचे दरवाजे दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचे डर्टी इलेव्हन आमच्यावर सुडाच्या राजकारणाचे आरोप करत आहेत. मात्र त्यांना आता सचिन वाझेच्या बाजूची खोली दिसत आहे. प्रताप सरनाईक, अनिल परब, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, महापौर पेडणेकर असो यांनी सगळ्यांनी हजारो कोटी लुटले आहेत, हा लुटीचा माल आम्ही सरकारच्या तिजोरीत परत आणण्याचं काम करत आहोत, असं सोमय्या म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा