अनिल परबना रिसॉर्टच्या कागदपत्रांसह ईडीने पु्न्हा बोलावले

अनिल परबना रिसॉर्टच्या कागदपत्रांसह ईडीने पु्न्हा बोलावले

अनिल परब यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी करण्यात आली. मंगळवारी अकरा तास चौकशी केल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला त्यानंतर त्यांना आज पुन्हा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. इकडे शिवसेनेचे एकनाथ शिंदे काही आमदारांसह बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत खळबळ उडालेली असताना आता अनिल परब यांना नोटीस आली होती.

बुधवारी दुपारी कॅबिनेट मिटिंग आटोपून परब हे दुपारी साडेतीन वाजता ईडी कार्यालयात हजर झाले. तब्बल साडे सहा तासाच्या चौकशी नंतर त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. परब यांना उद्या पुन्हा चौकशी साठी हजर राहण्यास समन्स बजावण्यात आले असून उद्या येताना साई रिसॉर्ट चे कागदपत्रे घेऊन येण्यास ईडीने सांगितले आहे.

महाराष्ट्रात जोवर हे नाट्य सुरु आहे तोवर मला चौकशीला बोलावलं जाईल अस दिसतंय पण मी चौकशीत सहकार्य करतोय. शिवसेनेचा जन्म संघर्ष करण्यासाठीच झालाय आणि शिवसेना तो करेल, असे परब यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार गाळात जाणार?

शिवसेनेने शस्त्र टाकली

मुख्यमंत्र्यांनी आपले बस्तान हलविले वर्षातून मातोश्रीवर

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २५५ लोकांचा मृत्यू

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही, याची खात्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियाद्वारे सांगितलं होतं की, ते शासकीय निवासस्थान सोडतील त्यानुसार त्यांनी सोडलेलं आहे. वर्षा निवासस्थान सोडून ते मातोश्री या त्यांच्या घरात परतले. मोठा गट शिवसेनेतून निघून गेल्यानंतर ते राजीनामा देतील अशी शक्यता होती, पण तूर्तास त्यांनी वर्षा निवासस्थान सोडल्याचे दिसले आहे.

Exit mobile version