“अनिल परब आणतात माझ्या कामात बाधा”

“अनिल परब आणतात माझ्या कामात बाधा”

एकेकाळचे कट्टर विरोधक असणारे शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष सध्या राजकीय तडजोड म्हणून राज्यात एकत्र सत्ता भोगत आहेत. तरीही महाविकास आघाडी या नावाखाली एकत्र आलेल्या या पक्षांतील मतभेद वेळोवेळी महाराष्ट्राच्या समोर येत आहेत. याचेच एक ताजे उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले जेव्हा काँग्रेसचा एक आमदार शिवसेनेच्या नेत्यावर संतापला आणि त्याने समाज माध्यमातून हा संताप जाहीर केला. शिवसेना नेते अनिल परब आपल्याला काम करून देत नसल्याचा आरोपही त्याने केला आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा थैमान सुरु असून देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित नागरिक हे महाराष्ट्रात आहेत. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असणारी लसीकरण मोहीम राज्यात राबवली जरी जात असली तरीही राज्यात लसीकरण केंद्रांची कमतरता जाणवत आहे. अशातच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. अशाच एका लसीकरण केंद्राचे उदघाटन गुरुवारी बांद्रा पूर्व येथे झाले. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. पण या उदघाटनाला काँग्रेसचे स्थानिक आमदार झीशान सिद्दीकी यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

हे ही वाचा:

“पवार साहेबांचे अदृश्य हात, अजित पवारांचे चोख नियोजन”

वाझे आणि काझीच्या कोठडीत वाढ

कुख्यात डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू

‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत

यावरूनच सिद्दीकी प्रचंड संतापले त्यांनी या उद्घाटन सोहळ्याचे फोटो समाज माध्यमांवर टाकत प्रोटोकॉल नुसार आपल्याला बोलावण्यात आले नसल्याचे सांगितले. “लसीकरणाच्या विषयात पण आपण राजकारण करणार आहोत का?” असा संतप्त सवाल सिद्दीकी यांनी यावेळी विचारला.

त्यानंतर सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यांनी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अनिल परब कायमच दुजाभाव करतात. माझ्या कामात कायमच अडथळा निर्माण करायचा परबांनी प्रयत्न केला आहे. कधी मला महापालिकेची परवानगी मिळत नाही. तर कधी उशिरा दिली जाते. पण मला या अडथळ्यांची सवय आहे. मी काम करत राहीन.” असे सिद्दीकी यांनी सांगितले आहे.

Exit mobile version