शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर परबांवर आणखी विश्वास वाढला असता, अशा शब्दांत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची खिल्ली उडविली आहे.
ईडीने मनी लॉंडरिंग प्रकरणात अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. त्यासंदर्भात परब हे ईडी कार्यालयात जाणार होते. त्याआधी त्यांनी म्हटले होते की, आपल्याला ईडी आपल्याला का बोलावले आहे हे माहीत नाही. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्यी मुलींची शपथ घेऊन सांगत आहे की, कोणत्याही गैरव्यवहारात आपला हात नाही. या चौकशीत जे विचारले जाईल, त्याचे उत्तर आपण देऊ. ईडीला आपण पूर्ण सहकार्य करू.
हे ही वाचा:
शिवसेना आमदार आशिष जयस्वालांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा
गुलाब चक्रीवादळाचा फटका; पावसाने महाराष्ट्राला झोडपले
दिल्ली उच्च न्यायालय म्हणते, दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित
परब यांच्या या वक्तव्यानंतर नितेश राणे यांनी टोला लगावला. शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर परबांवर अधिक विश्वास वाढला असता असे नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.
स्व.शिवसेनाप्रमुखांपेक्षा..
आताच्या पक्षप्रमुखांची शप्पत घेतली असती..
तर परबांवर अजुन विश्वास आला असता!!— nitesh rane (@NiteshNRane) September 28, 2021
शनिवार, २५ सप्टेंबर रोजी परब यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली होती. या नुसार आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी परब यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार परब हे आता ईडी कार्यलयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. या आधी ३१ ऑगस्ट रोजी परब यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण पुढे करत अनिल परब चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. पण यावेळी मात्र चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय परब यांनी घेतला आहे.