गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून यावर आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंडस्ट्रीयल कोर्ट, उच्च न्यायलयाने हा संप बेकायदेशीर ठरवला. अवमान याचिका दाखल करण्याबाबत कोर्टाने सांगितले. त्यानुसार महामंडळ अवमान याचिका दाखल करत आहे, असे अनिल परब म्हणाले. दिवाळी आधीपासून या मागण्यांवर चर्चा सुरु होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या पूर्णपणे मान्य केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आता सरकारमध्ये विलिनीकरणाची नवीन मागणी केली आहे. हायकोर्टाने निर्देश दिलेत. त्या निर्देशाचं पालन आम्ही केले आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
हे ही वाचा:
हॉस्पिटलच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर बलात्कार
‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’
अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं; ९ जणांना वाचवण्यात यश
हायकोर्टाने जी समिती स्थापन करायला सांगतिली होती. आम्ही ती समिती स्थापन केलीय. ती समिती विचार करुन १२ आठवड्यांच्या आत याचा तपशील मुख्यमंत्र्यांकडे सोपवेल. मुख्यमंत्री तो अहवाल हायकोर्टात सादर करतील. हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करणे सरकारचे कर्तव्य आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.
‘एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. कर्मचाऱ्यांनी आर- पार ची लढाई करू नये. मला कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती आहे. त्यांचा पालक म्हणून मी प्रयत्न करत आहे. मी त्यांच्या नेत्यांशी बोलत आहे. वातावरण खराब होऊ नये अशीच इच्छा आहे. कोणीतरी भडकवतोय म्हणून कामगारांनी चिडू नये,’ असेही अनिल परब म्हणाले.