सोमय्यांनी हिंमत असेल तर समोर यावे,

अनिल परब यांचे सोमैय्यांना खुले आव्हान

सोमय्यांनी हिंमत असेल तर समोर यावे,

अनिल परब यांचे वांद्रे येथील जनसंपर्क कार्यालय काल तोडण्यात आले आहे. याबाबत परब यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अनिल परब पत्रकार परिषदेत म्हणाले, वांद्रे येथील कार्यालय माझ्या मालकीचे नव्हते. हे कार्यालय तोडल्यानंतर किरीट सोमय्या या पाडकामाची पाहणी करणार असल्याचे समजले. किरीट सोमय्या आहेत तरी कोण?ते म्हाडाचे अधिकारी आहेत की महापालिकेचे? “इकडे येऊन पाहणी करणार म्हणजे काय?” असा सवाल अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पूढे अनिल परब म्हणाले की , आम्हीही किरीट सोमय्यांचीच वाट पाहत आहोत. किरीट सोमय्यांना रस्त्यात कुठेही अडवू नका, असे आम्ही पोलिसांना सांगितले आहे. आम्ही शिवसैनिक किरीट सोमय्यांची वाटच पाहत आहोत. आम्ही किरीट सोमय्यांचे आमच्या स्टाईलने जोरदार स्वागत करू. किरीट सोमय्या आता गरीबांच्या घरावर उठले आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरायलाही आम्ही कमी करणार नाही, असे अनिल परब म्हणाले.पत्रकार परिषदेत पुढे अनिल परब म्हणाले की, वांद्रे येथील म्हाडा वसाहतीत माझे जे जनसंपर्क कार्यालय होते, ते माझ्या मालकीचे नाही. माझा जन्म याच वसाहतीत झाला आहे. पुढे आमदार, मंत्री झाल्यावर इथल्या लोकांनी आपल्या तक्रारी माझ्यापर्यंत मांडण्यासाठी एखादे कार्यालय असावे, या हेतूने हे कार्यालय बांधले होते. माझा संबंध नसताना माझे या कार्यालयाशी नाव जोडले जात आहे.

पोलिसांनी सोमय्यांची गाडी अडवली
दरम्यान , किरीट सोमय्या दुपारी साडे बारा वाजता बांद्रा येथील अनिल परबांच्या तोडलेल्या जागेला भेट देणार होते. त्यासाठी किरीट सोमय्या निघालेही होते. मात्र, अनिल परब यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बांद्रा येथील संबंधीत म्हाडाच्या वसाहतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी किरीट सोमय्यांची गाडी अडवली.बीकेसी येथे पोलिसांनी किरीट सोमय्या यांची गाडी अडवली होती.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

म्हाडा वसाहती परिसरात असलेल्या अधिकच्या मोकळ्या जागेवर या कार्यालयाचे बांधकाम केले होते. मुंबईत म्हाडाच्या एकूण ५६ वसाहती आहेत. तेथे अधिकच्या जागेवर गरीबांनी आपली घरे वाढवली आहेत. मात्र, बिल्डरांनी यापैकी केवळ २२० स्क्वेअर फूट नागरिकांना देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळेच सोमय्यांनी या अधिकच्या जागेवर आक्षेप घेऊन बिल्डरधार्जिणी भूमिका घेतली आहे. याच बिल्डरांकडून सुपारी घेऊन किरीट सोमय्या माझ्यावर हे आरोप करत आहे.
म्हाडातील माझ्या कार्यालयावर ज्याप्रमाणे म्हाडाने कारवाई केली त्याचप्रमाणे म्हाडाच्या ५६ वसाहतींमध्येही अशीच कारवाई झाल्यास गरीबांचे मोठे नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार किरीट सोमय्या आणि भाजप असणार आहे. याच्याविरोधात रस्त्यावर उतरायलाही आम्ही कमी करणार नाही.असेही परब यावेळेस म्हणाले.

 

Exit mobile version