डेलकर प्रकरणी अनिल परब तोंडावर पडले

डेलकर प्रकरणी अनिल परब तोंडावर पडले

सचिन वाझेंविरोधात गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारल्यावर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी माजी खासदार मोहन डेलकर आत्महत्त्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु फडणवीस यांनी डेलकर यांची आत्महत्त्येपूर्वी लिहिलेली चिट्ठीच सभागृहासमोर ठेवल्याने सभागृहात प्रचंड गदारोळामध्येही शांतता पसरली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंना मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक व्हावी म्हणून मागणी केल्यानंतर, विषयाला बगल देत, अनिल परब यांनी दादरा नगर हवेलीचे माजी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्त्येचा मुद्दा उपस्थित केला. अनिल परब यांनी असा दावा केला की “मोहन डेलकर यांनी आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांचीही चौकशी व्हावी. ज्या प्रकारे विरोधीपक्ष नेते (देवेंद्र फडणवीस) सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा डेलकर यांच्या आत्महत्त्येची चौकशी व्हावी ही मागणी करत आहोत.” हे सांगताना परब यांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांना उठून आवाज करत घोषणा देण्याची खूण केली. परब यांच्या इशाऱ्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार हे गहजब करू लागले.

हे ही वाचा:

सचिन वाझेंनीच केला मनसुख हिरेन यांचा खून?

तेवढ्यात विरोधीपक्ष नेते, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच हे पत्र दाखवत असे सांगितले की, “त्यांच्या आत्महत्ये पूर्वीच्या पत्रात कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही. केवळ प्रशासकाचं नाव घेतलेलं आहे. तो कोणत्याही पक्षाचा नाही. (हातातील कागद दाखवत) ही मोहन डेलकरांची सुसाईड नोट आहे. यामध्ये कोणाचंही नाव नाही. सचिन वाझेंना वाचवण्याकरता तुम्ही मोहन डेलकरांना ढाल करू शकत नाही.”

 

Exit mobile version