अनिल परब ईडीसमोर गैरहजर! पत्र पाठवून सांगितले कारण…

अनिल परब ईडीसमोर गैरहजर! पत्र पाठवून सांगितले कारण…

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सहकारी अनिल परब हे आज सक्तवसुली संचालनालया (ईडी) समोर हजर राहिले नाहीत. पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण पुढे करत अनिल परब यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्यास असमर्थता दर्शवली. ईडी अधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांनी याबाबतची माहिती दिली.

रविवार, २९ ऑगस्ट रोजी अनिल परब यांना शंभर कोटी वसुली प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालयाने दिले होते. आज म्हणजेच मंगळवार, ३१ ऑगस्ट रोजी अनिल परब यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. पण अनिल परब यांनी स्वतः गैरहजर राहत आपल्या वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवले आहे.

हे ही वाचा:

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

मंत्री असल्यामुळे आपले कार्यक्रम अगोदरच ठरले असून ते रद्द करता येणार नसल्याचे अनिल परब यांनी पत्राद्वारे ईडीला कळवले आहे. तर या पत्रात परब यांनी ईडीकडे १४ दिवसाची मुदत मागून घेतली. ईडीने परब यांचे हे पत्र स्वीकारले असून अनिल परब यांना वेळ द्यायचा की, त्यांना दुसरे समन्स काढायचे या विचारात ईडीचे अधिकारी आहेत.

दरम्यान सोमवारी परब यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. परब यांच्यावर परिवहन खात्यात पदोन्नत्तीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच परिवहन पदोन्नती घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत. त्यानुसार २ सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Exit mobile version