27 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणशपथेवर फेटाळले शंभर कोटींचे आरोप

शपथेवर फेटाळले शंभर कोटींचे आरोप

Google News Follow

Related

सचिन वाझे याने लिहिलेल्या कथित पत्रातून महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर शंभर कोटीच्या वसुलीचे आरोप केल्यानंतर राज्यभर एकाच खळबळ उडाली. या आरोपांची दखल खुद्द अनिल परब यांनी घेतली. परब यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेत हे आरोप फेटाळले. यासोबतच परब यांनी या आरोपांसाठी भारतीय जनता पार्टीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे. बुधवारी वाझे याचे एक कथित पत्र समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाला उद्देशून वाझेने हा पत्ररूपी जबाब दिला आहे. या पत्रात वाझे यांनी असे आरोप केल्येत की अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या अंदाजे ५० भ्रष्ट काँट्रॅक्टर्स कडून प्रत्येकी २ कोटी वसूल करण्यास सांगितले तर एसबीयुटी या संस्थेच्या विश्वस्तांकडून ५० कोटी आणण्यास सांगितल्याचा आरोप केला.

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांना उत्तर दिले. यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेत परब यांनी भावनीक झाल्याचे दाखवले. आपण निर्दोष असल्याचा दावा करताना आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत असा दावाही परब यांनी केला. वाटल्यास माझी नार्को टेस्ट करा असेही ते म्हणाले. तर सचिन वाझेच्या आरोपांवरून परब यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचे षडयंत्र रचले आहे. वाझेने गेल्या वर्षी जून महिन्यात काय झाले हे का नाही सांगितले असा उलटा सवालही परब यांनी केला आहे.

हे ही वाचा:

गँग्स ऑफ ‘वाझे’पूरशी जोडले गेले अनिल परबांचे नाव

अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी मागितले २ कोटी, वाझेच्या कथित पत्रात गौप्य्स्फोट

अयोध्येतील रस्त्याला कोठारी बंधूंचे नाव

अजित पवारांवरही सचिन वाझेकडून आरोपांच्या फैरी

वाझेने काय गौप्यस्फोट केला आहे?
“जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये मला मा.मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवले. त्याच आठवड्यात मुंबईतील उपायुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये ३-४ दिवसात फेरबदल होणार होते. परब यांनी मला ‘एसबीयुटी’च्या (सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट) तक्रारीत लक्ष घालण्यास सांगितले ज्यात प्राथमिक चौकशी सुरू होती. त्यांनी मला या संस्थेच्या विश्वस्तांना चौकशी संदर्भातील वाटाघाटींसाठी भेटायला घेऊन येण्यास सांगितले. तसेच ही चौकशी बंद करण्यासाठी संस्थेकडे ५० कोटी रूपयांची मागणी करण्यासाठीची प्राथमिक चर्चा करण्यासाठीही सांगितले. यावेळी मी एसबीयुटीच्या लोकांना ओळखत नसल्याने त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करण्यास अपात्र असल्याचे सांगितले.

जानेवारी २०२१ मध्ये परब यांनी पुन्हा एकदा मला त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावले. यावेळी त्यांनी मला मुंबई महापालिकेतील भ्रष्ट काँट्रॅक्टर्स विरोधातील चौकशीत लक्ष घालण्यास सांगितले. त्यांनी मला या अंदाजे ५० काँट्रॅक्टर्स कडून प्रत्येकी २ कोटी रूपये आणण्यास सांगितले.”

असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी केला आहे. अनिल देशमुख यांच्या नंतर परब यांच्यावरही १०० कोटींचे आरोप लागले आहेत. त्यामुळे आता परब यांच्यावरील आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवे वळण येते याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा