अनिल परबांच्या रिसॉर्टवर फिरणार बुलडोझर?

अनिल परबांच्या रिसॉर्टवर फिरणार बुलडोझर?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर आता बुलडोझर फिरणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. कारण अनिल परब यांचे रिसोर्ट पाडण्यासाठी शासनाने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधीचा दावा केला आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैय्या हे गेल्या काही महिन्यांपासून अनिल परब यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. सुरुवातील सोमैय्या यांनी परब यांच्या दापोई येथील रिसॉर्ट संदर्भात तक्रार केली होती. तर नंतर अनिल परब यांच्या रिसॉर्टचा सातबारा समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला होता.

हे ही वाचा:

सरसंघचालकांनी घेतले भगवान जगन्नाथाचे दर्शन, गोवर्धन पिठाच्या शंकराचार्यांशीही भेट

लीड्स कसोटीत इंग्लंड मजबूत स्थितीत

मैसूर महापालिकेत कमळ फुलले! पहिल्यांदाच भाजपाचा महापौर

संशयित वॅगनार आणि अटकेत चार! ठाण्यातील भरत जैन हत्याकांडाचा उलगडा

अनिल परब यांचे हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून हे रिसॉर्ट एका शेतजमिनीवर बांधले असल्याचे सोमैय्या यांचे म्हणणे होते. त्यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तर केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) परब यांच्या रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेडच्या उल्लंघनाची सखोल चौकशी करण्यास सुरूवात केली होती.

या प्रकरणात आता नवे वळण आले असून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी परब यांना नोटीस बजावण्यात आल्याचे सोमैय्या यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोमैय्या यांनी हा दावा केला आहे. तर ‘अनिल परबचे रिसॉर्ट कधी पाडणार?’ असा सावलाही विचारला आहे.

Exit mobile version