शिवसेनेने मदतीचे चेक परत घेऊन दाखवले

शिवसेनेने मदतीचे चेक परत घेऊन दाखवले

कोकणामध्ये पुराने थैमान घातल्यानंतर आता पालक मंत्री अनिल परब यांनी तेथील लोकांच्या दुःखावर जणू मीठ चोळलं आहे. रत्नागिरी भेटीवर असलेल्या पालकमंत्र्यांनी मदतीचे दिलेले चेक परत घेण्याचा अतिशय संतापजनक प्रकार कोकणामध्ये घडला आहे.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे या गावामध्ये संतापजनक घटना घडली. रत्नागिरी जिल्ह्याला देखील पुराचा जबरदस्त फटका बसला होता. या जिल्ह्यातल्या पोसरे गावामध्ये मंत्री महोदयांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मदतीचे चेक दिले होते. त्यानंतर ते चेक अधिकाऱ्यांनी परत काढून घेतले. त्यामुळे मंत्र्यांनी हे चेक केवळ फोटोसेशनसाठी दिले का असा संतप्त सवाल केला जात आहे.

हे ही वाचा:

भारताचा चीनवर ‘हार्पून’ वार

भालाफेक, कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला

इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवायला भारत सज्ज

‘रॉ’ एजंटच्या भूमिकेत दिसणार ‘खिलाडी’ कुमार! बघा ‘बेलबॉटम’ चा धमाकेदार ट्रेलर

मंत्र्यांनी दिलेले चेक काढून घेताना, मदतीची रक्कम ऑनलाईन अदा केली जाणार असल्याचे देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ठाकरे सरकारच्या या अतिशय असंवेदनशील वर्तणुकीवरून जोरदार टीका केली जात आहे. भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून देखील या प्रकारावर जोरदार टीका करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की,

जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा रे!

अनिल परब, तुम्हाला फोटोसेशनची एवढी हौस आहे तर तुमच्या घराजवळच एक फोटोग्राफर आहेत. जे घरी बसूनच असतात. त्यांच्याकडे जायचे. ग्रामस्थांना मदतीचे चेक देण्याची नौटंकी करून त्यांच्या वेदनांवर मीठ का चोळता?

Exit mobile version