अनिल देशमुखांची जे.जे. रुग्णलयातच होणार शस्त्रक्रिया

अनिल देशमुखांची जे.जे. रुग्णलयातच होणार शस्त्रक्रिया

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. खासगी रुग्णालयात अनिल देशमुखांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेची परवानगी नाकारली आहे.

अनिल देशमुखांना खासगी रुग्णालयात तातडीने उपचारांची गरज नाही, त्यांचे जे.जे रुग्णालयातही उपचार होऊ शकतात, असे जे.जे रुग्णालयाच्या तज्ञांच्या मतं आहे. त्यामुळे देशमुखांवर जे.जे रुग्णालयातच उपचार आणि शस्त्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना देशमुख परीवारातील कोणती व्यक्ती त्यांच्यासोबत थांबेल याचे नाव न्यायालयाने द्यायला सांगितले आहे.

देशमुखांनी खांदेदुखीच्या त्रासावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव असल्याने आणि त्यांचे वाढते वय पाहता खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती.

हे ही वाचा:

‘सत्तेसाठी ठाकरे सरकारने हिंदुत्व गहाण ठेवले’

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

मात्र, अनिल देशमुख यांनी केलेल्या अर्जानंतर ईडीने न्यायालयासमोर देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर केला. हा अहवालच निर्णायक ठरला. देशमुखांना खांदेदुखीचा त्रास होत होता, त्यामुळे त्यांच्यावर जे.जे रुग्णालयातही उपचार होऊ शकतात, असे ईडीने म्हटले आहे. त्यावर सुद्धा देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला होता. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता, त्यावर आज निकाल देण्यात आला आहे.

Exit mobile version