“चौकशीची मागणी करणाऱ्यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी आवश्यक”- देवेंद्र फडणवीस

“चौकशीची मागणी करणाऱ्यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी आवश्यक”- देवेंद्र फडणवीस

भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या चौकशीचे आदेश मागे घ्यावेत आणि त्याऐवजी सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी. अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून राम कदम यांनी काँग्रेसची भाषा बोलणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याचं कारण सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली होती.

राज्य सरकारचा सेलिब्रेटीच्या ट्विटची चौकशी करण्या निर्णय हा संतापजनक आहे. कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? अशा प्रश्नांची सरबत्ती महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. “भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. “भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे.” असा संताप देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. “खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Exit mobile version