अनिल देशमुखांचा ईडी मुक्काम ३ दिवसांनी वाढला

अनिल देशमुखांचा ईडी मुक्काम ३ दिवसांनी वाढला

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत. अनिल देशमुखांच्या पुढील चौकशीसाठी ईडीने पुढील देशमुखांची कस्टडी वाढवून मागितली होती. ईडी कस्टडीला विरोध करत अनिल देशमुखांच्यावतीने युक्तिवाद देखील केला गेला. मात्र ईडीने आणखी ३ दिवसांची कस्टडी वाढवून मागितली. आम्हाला देशमुखांची कस्टडी चौकशीसाठी नको असून केवळ त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे. अशी माहिती ईडीने कोर्टाला दिली.

१०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. ईडी मार्फत देशमुख यांची कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने त्याला नकार दिला असून अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार देशमुख यांना शनिवारी मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात हलवण्यात आले.

हे ही वाचा:

न्यूझीलंडविरुद्ध भारताची टीम घोषित, कोण आहे नवीन कर्णधार?

खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

पण रविवार, ७ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात महत्वपूर्ण निकाल देताना अनिल देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली आहे. देशमुख यांच्या कस्टडीसाठी ईडीमार्फत उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यावरच उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख हे आता आजपासून पुढील सहा दिवस म्हणजेच १२ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत.

Exit mobile version