अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी याच आठवड्यात

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी याच आठवड्यात

सीबीआय याच आठवड्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावू शकते. शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयमधील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

सीबीआय अधिकारी काल (११ एप्रिल) सचिन वाझे यांच्या दोन चालकांना डीआरडीओ मध्ये घेऊन आले होते. तर अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांना बोलावण्यात आलं होतं. या सगळ्यांची आठ ते दहा तास चौकशी करण्यात आली. याआधी अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे,  महेश शेट्टी बार मालकासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, तक्रारदार वकील जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. याप्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबानं केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती.

हे ही वाचा:

सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू

लॉकडाऊनच्या भीतीने सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

गरज अकार्यक्षमतेला लस टोचण्याची!

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

सीबीआयने सचिन वाझेच्या केबिनमधून मिळालेली डायरीही सीबीआयने आपल्या ताब्यात घेतली आहे. या डायरीत त्याच्या सर्व वसुलीचा रेटकार्डचा उल्लेख आहे. तसंच कोणासोबत किती रुपयांचा व्यवहार झाला ही बाबही नमूद करण्यात आली आहे.

Exit mobile version