अनिल देशमुखांची केस आता सीबीआयकडे

अनिल देशमुखांची केस आता सीबीआयकडे

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर, डॉक्टर जयश्री पाटील यांनीदेखील या प्रकरणात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआयला आदेश दिले आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात पुढील पंधरा दिवसात प्राथमिक चौकशी करून दखलपात्र गुन्हा आढळल्यास एफआयआर नोंदवण्याचे आदेशही दिले आहेत. डॉक्टर जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयाबाहेर ही माहिती माध्यमांना दिली.

परमबीर सिंह यांच्यावतीनं वकील विक्रम ननकानी यांनी बाजू मांडली. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आणखी तीन याचिकावरही सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली.मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा:

सामान्य जनतेसाठी लॉकडाऊन, मंत्री मात्र विनामास्क प्रचारात

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

नितीन गडकरींकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

धर्म बदलून निकाह कर…नाहीतर तुझीही निकिता तोमर करू.

भितीदायक, महाराष्ट्राने ओलांडला ५०,००० रुग्णवाढीचा टप्पा

याबरोबरच जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करत असताना, अनिल देशमुख गृहमंत्री पदावर असताना, पोलीस निष्पक्ष तपास करू शकत नाहीत. असेही उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

Exit mobile version