अनिल देशमुखांना १०० दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार

अनिल देशमुखांना १०० दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार

गेल्या अनेक महिन्यांपासून नॉट रिचेबल असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज अखेर प्रकटले. अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाले असून सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांची चौकशी सुरु आहे. या वरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी अनिल देशमुखांना १०० दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार असल्याचे म्हटले आहे. तर अनिल देशमुख यांच्या नंतर अनिल परब यांचा नंबर असल्याचा दावाही सोमैय्या यांनी केला आहे.

भाजपा नेते किरीट सोमैय्या हे गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे सरकारच्या मागे हात धुवून लागले आहेत. त्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून त्याचे पुरावे ईडी कार्यालयात सुपूर्त केले आहेत. सोमवार, १ नोव्हेंबर रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडी कार्यलयात प्रकट झाल्यानंतर सोमैय्या आक्रमक झाले असून त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर

जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीपुढे ठाकरे सरकार झुकणार?

नवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन

अखेर अनिल देशमुखना ईडी कार्यालयात यावे लागले. त्यांना १०० दिवस ईडीच्या कस्टडीत, जेल मध्ये रहावे लागणार आहे. दर महिन्याचा १०० कोटींच्या वसुलीचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे. शरद पवारांकडे दर महिन्याला किती? उद्धव ठाकरेंना किती? या साऱ्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. तर पहिली अटक जितेंद्र आव्हाडांची झाली. आता अनिल देशमुखांची होणार आणि पुढे अनिल परब ईडी समोर आणि जेलमध्ये जाणार असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.

Exit mobile version