अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १ नोव्हेंबर रोजी पीएमएलएच्या विविध कलमांखाली अटक केली होती.

रिमांड वाढवण्याची मागणी करणारी ईडीची याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने ६ नोव्हेंबर रोजी देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी त्यांच्यावर खंडणी आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लावले होते.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगणे यासह अनेक गैरकृत्यांमध्ये देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप सिंग यांनी केला होता.

हे ही वाचा:

काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः ‘इस्लामिक राष्ट्र’ होते

हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

१०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. ईडी मार्फत देशमुख यांची कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने त्याला नकार दिला असून अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार देशमुख यांना शनिवारी मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात हलवण्यात आले.

Exit mobile version