अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा

अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसात सीबीआयनं पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला आहे. आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सिल्वर ओक वर बैठक झाली आहे. सीबीआय चौकशीच्या कोर्टाच्या निर्णयामुळं अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याची बोललं जात आहे.

मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला १५ दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

हे ही वाचा:

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा?

अक्षय कुमार पाठोपाठ विकी कौशललाही कोरोनाची लागण

आता गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या तत्त्वाला अनुसरून राजिनामा द्यावा

थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची बातमी माध्यमांना दिली. अनिल देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपवणार असून मुख्यमंत्री तो राजीनामा स्वीकारतील अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली आहे.

Exit mobile version