मनी लॉंड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीमुळे देशमुखांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासह सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांनादेखील १४ दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावली आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुखांची चौकशी सुरू असताना त्यांच्या सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली होती. अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नाहीत, ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासह इतरांचीही कस्टडी वाढवून हवी असा युक्तीवाद सीबीआयने न्यायालयात केला होता. पण विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली. आणि चारही आरोपींना आता २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र जेव्हा ईडी न्यायालयात सुनावणी असेल तेव्हा आरोपींना हजर राहावे लागणार आहे.
यापूर्वी अनिल देशमुखांसह चारही आरोपींची कोठडी १६ एप्रिलपर्यंत होती. त्यामुळे १६ एप्रिलपर्यंत हे सर्व आरोपी सीबीआयच्या ताब्यात होते. त्यांनतर आज म्हणजेच १६ एप्रिल पासून त्यांना १४ दिवसांची न्यायाललीन कोठडी सुनावली आहे. तसेच आरोपी देशमुखांची औषधे देण्याची आणि वयोमानानुसार बिछाना देण्याचे निर्देश कारागृह विभागाला दिले आहेत. त्याशिवाय घरचे जेवण देण्याची अर्जावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
हे ही वाचा:
शरद पवार भाषण करताना व्यक्ती पोहोचला मंचावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन
एमआयएमचा पदाधिकारी बायकोसोबत करणार हिंदू धर्मात प्रवेश
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर देशमुख अडचणीत सापडले. त्यांनतर, २१ एप्रिल २०२१ रोजी देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली होती. तेव्हापासून देशमुख आर्थररोड तुरुंगात आहेत.