मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केल्यानंतर आता गृहमंत्र्यांनी चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.
गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात चौकशी करा अशी विनंती करणारे पत्र लिहील्याचे ट्वीट करून स्वतःची प्रतिमा जपण्याचा अटोकाट प्रयत्न केलेला दिसून येत आहे.
हे ही वाचा:
युजीसीने केलेल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातील बदलांमुळे बुद्धीजीवींचा पोटशूळ
सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?
त्याबरोबरच या ट्वीटमध्ये शहाजोगपणे परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून “दूध का दूध पानी का पानी” करावे अशी मागणी केली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली तर मी त्याचे स्वागतच करीन असे म्हटले आहे. याबाबत इतके दिवस उलटूनही गप्प असलेले मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी दर महिन्याला गोळा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा लेटरबॉँब महाविकास आघाडीवर टाकला होता. यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्ले करायला सुरूवात केली. गृहमंत्र्यांच्या बचावासाठी आघाडीतील शरद पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी देखील दोन पत्रकार परिषदा घेतल्या. मात्र त्यातील सफेद झूठ थोड्याच काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले. याबरोबरच विरोधी पक्षाने सातत्याने गृहमंत्र्यांचा राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
परमबीर सिंह यांच्या आधी सुबोध जयस्वाल यांनी पोलिस बदल्यांतील घोटाळा उघड केला होता. त्याचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. त्यानंतर कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी देखील कायदेशीर पद्धतीने फोन टॅप करून याबाबतीतील एक अहवाल उघड केला होता. मात्र या गंभीर अहवालांवर अद्याप कारवाई झाली नसल्याने, हा डेटा आणि अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृह सचिवांना दिला असे देखील कळले आहे.