‘अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परबांचा’

‘अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परबांचा’

तब्बल साडे आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुढील अटकेचा इशारा दिला आहे. “अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी आणि माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही, असा दावा देखील किरीट सोमय्या यांनी दिला आहे. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

नवाब मालिक यांना करण्यात आलेली अटक ही महाविकास आघाडीला मोठा झटका मानला जात आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर आता नवाब मलिक यांना अटक झाली आहे. बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच नवाब मलिक यांची चौकशी ईडी मार्फत केली जात होती. पहाटे ४.३० वाजता ईडी अधिकाऱ्यांचे पथक मलिक यांच्या मुंबई येथील निवासस्थानी दाखल झाले होते. तेथून त्यांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर सकाळी ७.४५ वाजता मलिकांच्या चौकशीला सुरुवात झाली होती.

हे ही वाचा:

ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी

साडे आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक

‘थयथायाट तीच लोक करतात जे उत्तर देऊ शकत नाहीत’

कुर्ल्यातील एक मोक्याची जमीन तुटपुंज्या किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर पत्रकार परिषदेत केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्या संदर्भात पुरावे दिले होते.

Exit mobile version