वाझेचा ‘नंबर वन’ अनिल देशमुखच!

वाझेचा ‘नंबर वन’ अनिल देशमुखच!

वसुलीच्या पैशांबाबत वाझेने केला ईडीकडे खुलासा

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी तसेच मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आणि १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी सध्या तुरुंगात असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने ईडीसमोर सगळे पत्ते खुले करायला सुरुवात केली आहे. सचिन वाझे बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे ‘नंबर १’ यांना द्यायचे आहेत, असे सांगत असे. ‘नंबर वन’ म्हणजे नक्की कोण याचा खुलासा ईडीच्या अधिकाऱ्यांना होत नव्हता. तो आता झाला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बार मालकाकडून वसूल केलेले ४ कोटी ७० लाख रुपये दिल्याची कबुली सचिन वाझेने ईडीकडे दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देशमुखांसाठी नंबर १ हा शब्दप्रयोग वाझे करत असे. ईडीच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे.

बार मालक जया पुजारी आणि महेश शेट्टी या दोघांनीही गुड लक मनी म्हणून डिसेंबर महिन्यात ४० लाख वाझेला दिले होते. हे पैसेही देशमुखांना गेले असेही वाझेने ईडी चौकशीत मान्य केले. ईडीने आतापर्यंतच्या तपासात ५० ते ६० कोटी रुपयांच्या व्यवहाराची माहिती मिळवली आहे. काही पैसे हे वाझे सीआययूमध्ये करत असलेल्या हायप्रोफायईल प्रकरणांच्या तपासादरम्यान जमवण्यात आल्याचाही ईडीला संशय.

ईडीने कोर्टाची परवानगी घेऊन तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेची चौकशी केली. ज्या चौकशीदरम्यान वाझेने या गोष्टी सांगितल्या अशी सूत्रांची माहिती आहे. ईडीने आत्तापर्यंत देशमुख यांचे सेक्रेटरी आणि सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर देशमुखांचीही चौकशी ईडी करणार आहे. सचिन वाझेने आपण संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना पैसे दिल्याचं याआधी सांगितलं होतं.

हे ही वाचा:

नारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती

खडसेंसाठी महत्वाचा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ

पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा कालवश

महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश

आरोपी सचिन वाझेने तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपर्कात असल्याचा खुलासा केला. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहेत. वाझे हा स्फोटकांनी भरलेली गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. या प्रकरणात सचिन वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेच्या चौकशीसाठी ईडी कोर्टाची परवानगी घेतली होती. त्यानुसार ईडीला १० ते १२ जुलै या काळात चौकशीसाठी परवानगी मिळाली.

१०० कोटी पैकी चार कोटी ७० लाख रुपयांच्या रोख रखमेचा ईडीच्या तपासात खुलासा झाला आहे. बाकी रक्कम कुठून गोळा झाली, कोणी गोळा केली, ती रक्कम कोणाला देण्यात आली, याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत.

Exit mobile version