लुटीच्या बुद्धिबळातले राजा आणि वजीर कोण??

लुटीच्या बुद्धिबळातले राजा आणि वजीर कोण??

वाझे हा मोहरा होता, देशमुख हे सुद्धा मोहराच आहेत…ईडीची कारवाई अंतिम लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल, अशी लूट आणि भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे, अशी टीका भाजपा मुंबईच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर शुक्रवारी ईडीने छापा घातल्यानंतर भाजपा मुंबईने ही कारवाई झालेले देशमुख हे मुख्य चेहरा नाहीत, तर त्यांच्या मागे आणखी मोठे चेहरे आहेत, असे आरोप होऊ लागले आहेत. भाजपा मुंबईने असाच सवाल उपस्थित केला आहे की, लुटीच्या बुद्धिबळातील राजा आणि वजीर कोण??

हे ही वाचा:

शिवसेना म्हणजे ‘बेकायदेशीर बंगलो’ सेना

देशमुख, परब ही प्यादी; खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर

मुंबई-पुण्यातील प्रसिद्ध परांजपे बिल्डर्स पोलिसांच्या ताब्यात

या भेटीमागे दडलंय काय?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असलेल्या परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट देत असल्याचा गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर यांनी हे आरोप केल्यामुळे महाराष्ट्रा खळबळ उडाली होती. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामाही दिला होता. याआधी सीबीआयने त्यांच्या घरावर धाडी घातल्या होत्या आणि आता ईडीने कारवाई केल्यामुळे देशमुख यांना लवकरच अटक होणार की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ईडीने देशमुख यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे आणि आता त्याची चौकशी सुरू आहे.

Exit mobile version