अनिल देशमुख ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत

अनिल देशमुख ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने अनिल देशमुखांची १० दिवसांसाठी पोलीस कस्टडी मागितली आहे. सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना आधीच ताब्यात घेतले असून देशमुखांनाही ताब्यात घेऊन चौघांचीही समोरासमोर बसवून चौकशी आवश्यक असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. ११ एप्रिलपर्यंत अनिल देशमुख हे सीबीआय कोठडीत असणार आहेत.

सीबीआयचा पूर्ण सेटअप दिल्लीत आहे. तसेच एफआयआरची नोंद दिल्लीत झाली आहे. आरोपींची तसेच पुराव्यांची शास्त्रीय पद्धतीने तपासणीची गरज असून त्या सर्व सोयी आणि उपकरण इथं उपलब्ध नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्यामुळे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची दिल्लीत नेऊन चौकशी करणे आवश्यक असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

हे ही वाचा:

यशवंत जाधव यांच्याभोवतीचा फास आवळला; प्रधान डीलर्स संचालकांविरोधात तक्रार

कामावर रुजू व्हा, उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना दिला इशारा

नरेंद्र मोदींच्या भेटीला शरद पवार! नेमकी कशावर चर्चा

अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं तपासयंत्रणेची मागणी स्वीकारली आहे. त्यामुळे सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि अनिल देशमुख यांची समोरासमोर बसवून चौकशी होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा आता केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे देण्यात आला आहे. याआधी ते अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात होते. आर्थर रोड तुरुंगातून त्यांच आजच सीबीआयने ताबा घेतला होता.

Exit mobile version