माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबत रोज अनेक नवे खुलासे बाहेर येऊ लागलेले आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता विविध तपास यंत्रणांनी लक्ष्य केलेले आहे.
आता आयकर विभागाने देशमुख आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे १७ कोटी रुपयांचे छुपे उत्पन्न शोधून काढले आहे. आयकर विभागाने अलीकडेच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांशी जोडलेल्या संस्थांवर छापे टाकले होते. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे छुपे उत्पन्न उघड झाले. आयकरच्या अधिकृत सूत्रांनी नुकतीच ही माहिती दिलेली आहे. आयकर विभागाला नागपूरस्थित ट्रस्टमध्ये राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांच्याशी निगडित आर्थिक अनियमितता आढळली आहे. देशमुख तीन शैक्षणिक संस्थाही चालवतात. इन्कम टॅक्सची सर्वोच्च संस्था सीबीडीटीने दावा केला आहे की, तपासात सापडलेले पुरावे स्पष्टपणे दर्शवतात की १७ कोटी रुपयांचे उत्पन्न लपवले गेले आहे.
हे ही वाचा:
चक्क कुत्र्यासाठी विमानात बुक केला बिझनेस क्लास
जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला
अरेरे ! एसटी कर्मचाऱ्याने बसमध्येच घेतला फास
… आणि बोटे छाटल्याच्या घटनेनंतर फेरीवाले पुन्हा अवतरले!
सीबीडीटीने सांगितले की, १७ सप्टेंबर रोजी नागपूर, मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे ३० परिसरांवर छापे टाकण्यात आले. देशमुख यांच्यावर ही कारवाई केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यांनी सांगितले की कारवाई दरम्यान अनेक लॉकर्स देखील सापडले, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय, ईडीकडून आधीच चौकशी सुरू आहे. त्याच्यावर महाराष्ट्र पोलिसांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी आणि मनी लाँडरिंगचा आरोप आहे. हे आरोप समोर आल्यानंतर देशमुख यांनी या वर्षी एप्रिलमध्ये उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ईडीने त्यांना पाचवेळा चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे, परंतु ते मात्र कायद्याच्या आड ते टाळत आहेत. आता ईडीने त्याच्याविरोधात न्यायालयात दारही ठोठावले आहे.