तुरुंगात पडून अनिल देशमुखांच्या खांद्याला इजा

तुरुंगात पडून अनिल देशमुखांच्या खांद्याला इजा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार, १ एप्रिल रोजी कारागृहात चालत असताना अनिल देशमुख पडले आणि त्यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागल्याची माहिती आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.

अनिल देशमुख यांना दुखापत झाल्यावर लगेच उपचारांसाठी शुक्रवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अनिल देशमुख हे तुरुंगातील बाथरूममध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत. आज त्यांचा एमआरआय काढण्यात आला आहे. अनिल देशमुख यांचा खांदा डिसलोकेट झाला असून पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

दोनच दिवसांत मुंबईची मेट्रो तीनवेळा बंद पडली

केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला

पुरोहितांना संरक्षण देण्याची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली गेल्या सहा महिन्यांपासून अनिल देशमुख हे आर्थर रोड तुरुंगात आहेत. आता त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडले जाईल. अनिल देशमुख, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि कुंदन शिंदे यांच्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली होती. आता ही चौकशी सीबीआयमार्फत होणार आहे. त्यासाठी सीबीआयकडून अनिल देशमुख यांचा ताबा घेतला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version