अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांना पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवार, ७ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील महत्वाचा निर्णय देत अनिल देशमुख यांना ईडीची कोठडी सुनावली आहे. शनिवारी सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांना १४ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. पण रविवारी उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे.

१०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. ईडी मार्फत देशमुख यांची कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने त्याला नकार दिला असून अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार देशमुख यांना शनिवारी मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात हलवण्यात आले.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे

PM मोदी पुन्हा अव्वल

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

आर्यन खान प्रकरण बनाव, सुनील पाटीलचा सहभाग

पण रविवार, ७ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात महत्वपूर्ण निकाल देताना अनिल देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली आहे. देशमुख यांच्या कस्टडीसाठी ईडीमार्फत उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यावरच उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख हे आता आजपासून पुढील सहा दिवस म्हणजेच १२ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत.

Exit mobile version