‘कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही’

‘कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही’

अमरावती बंदप्रकरणी भाजप नेते माजी मंत्री अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती बंदमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी त्यांना अटक केली असून अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

यानंतर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीत मुस्लिमांनी जो हिंसाचार केला, त्याचा शांततापूर्वक निषेध व्यक्त करणाऱ्यांचा आवाज महाविकास आघाडी सरकार दाबत आहे. आज सकाळी ६ वाजता पोलिसांनी माझ्या घराला घेराव घातला, असे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे. ‘कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही,’ असे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः ‘इस्लामिक राष्ट्र’ होते

हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

त्रिपुरा राज्यात मशीद जाळण्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात १२ नोव्हेंबर रोजी रझा अकादमीने मोर्चा काढला होता. त्यानंतर एक दिवसीय बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद दरम्यान अनिल बोंडे रस्त्यावर उतरले होते. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले होते. यानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे आणि सभागृह नेते तुषार भारतीय यांना अटक केली आहे. काही भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी टाकत असल्याचेही वृत्त होते.

Exit mobile version