सध्या महाराष्ट्रात युपीए अध्यक्ष पदाची चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रस्तावामुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे. तरी आता याच मुद्द्यावरून विरोधकही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते माजी मंत्री अनिल बोंडे यांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. मुंडावळ्या बांधून नवरदेव सजला, घोड्यावर बसला, पण आता यूपीएचे घटक या नवरदेवाला स्वीकारणार का? हे बघणे महत्त्वाचे आहे असे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी स्वतःची आरती स्वतःवर घेतली युपीएच्या कोणताच घटक पक्षाने त्यांना प्रस्तावही दिला नाही आमंत्रण नाही दिलं नाही म्हणून म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुणांना हाताशी धरून स्वतःच्या उपस्थिती प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि टाळ्या वाजवून घेतल्या. मुंडावळ्या बांधून नवरदेव सजला, घोड्यावर बसला, पण आता यूपीएचे घटक या नवरदेवाला स्वीकारणार का? सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी, नाना पटोले हे त्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारायला तयार आहेत का? हे बघावे लागेल असे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांच्या युपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांची बॅटिंग
कोकण रेल्वेची धमाकेदार कामगिरी! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक
आदित्य ठाकरे यांच्या सूचनेला बारसू ग्रामस्थांचा विरोध
महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?
ममता बॅनर्जी शरद पवारांना स्वीकारणार का हेदेखील पाहणे महत्त्वाचे असून त्यासाठी पवारांनी फिल्डींग लावली असेल. प्रशांत किशोर यांच्या मार्फत पवारांनी फिल्डिंग लावली असू शकते की या वयात मला नवरदेव बनवा. पण आता मुंडावळ्या बांधून बसलेल्या नवरदेवाला युपीएचे घटक स्वीकारणार का हे महत्त्वाचे ठरणार आहे अशी बोचरी टीका बोंडे यांनी केली.
शरद पवारांना युपीए अध्यक्ष बनवण्याच्या ठरावामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात एकत्र सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकार मधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पारित केलेल्या या प्रस्तावाला काँग्रेसच्या गोटातून विरोध होताना दिसत आहे.