अनिल अँटनींच्या भाजपाप्रवेशाबद्दल त्यांच्या आईला आनंद

आई एलिझाबेथ यांनी सांगितली कहाणी

अनिल अँटनींच्या भाजपाप्रवेशाबद्दल त्यांच्या आईला आनंद

काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी हे आता भाजपामध्ये गेले आहेत. त्यावरून त्यांच्या आईने दिलेली प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे. अनिल अँटनी यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले. पण त्यांच्या आईने या निर्णयाचे आता स्वागत केले असून आपल्या मनात भाजपाबद्दल असलेला द्वेष, घृणा संपली असल्याचे त्या म्हणाल्या.

 

 

केरळमधील एका कार्यक्रमात बोलताना अनिल अँटनी यांच्या आई एलिझाबेथ म्हणाल्या की, अनिलला भाजपाकडून ऑफर आली आहे, हे मला आधीच ठाऊक होते पण त्याने या पक्षात प्रवेश केल्यानंतर माझा या पक्षाबद्दल मनात असलेला द्वेष दूर झाला.

 

हे ही वाचा:

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !

सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या मुलाला राजकारणात नवी संधी मिळाली आहे. आमची दोन्ही मुले राजकारणात येऊ इच्छित होती. पण काँग्रेस पक्षात चिंतन शिबिरात वंशवादाविरोधात प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यामुळे आमच्या इच्छेला सुरुंग लागला. तेव्हा माझ्या मुलाला राजकारणात प्रवेश मिळणार नाही, हे स्पष्ट झाले. माझ्या पतीनी पण त्यांना राजकारणात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केले नाहीत.

 

 

एलिझाबेथ म्हणाल्या की, मी माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी खूप प्रार्थना केली आणि त्याला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. अनिलने मला सांगितले की, त्याला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. भाजपात प्रवेश करण्याविषयी त्याला विचारण्यात आले आहे. त्या म्हणाल्या की, त्याने राजकारणात प्रवेश करण्याचा निश्चय केला होता. तो आता ३९ वर्षांचा आहे. पण त्याच्या या निर्णयामुळे माझ्या पतीना धक्का बसला. घरी दोघेही एकत्र आले तर काय होईल, ही चिंता होती. पण मी घरातले वातावरण चांगले राहावे यासाठी प्रार्थना केली. ए.के. अँटनी यांनीही त्याला स्वीकारले. तो त्याला हवे तेव्हा घरी येऊ शकतो, असे सांगत अँटनी यांनी मुलाला परवानगी दिली पण घरात राजकारणाची चर्चा नको असे बजावले.

Exit mobile version