काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. गुरुवारी त्यांनी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि व्ही. मुरलीधरन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. २५ जानेवारीला त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील बीबीसी माहितीपटावर अँटनी यांनी टीका केली होती.
हा प्रवेश झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अँटनी म्हणाले की, सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते हे एका कुटुंबासाठी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला वरच्या क्रमांकावर ठेवण्याचा दृष्टिकोन बाळगत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या या कामात आमच्यासारख्या युवकांनी योगदान देणे ही आमची जबाबदारी आहे.
अनिल अँटनी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे गोयल यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, अनिल अँटनी यांनी बीबीसीचा माहितीपट म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे असे म्हटले होते. ते भारताच्या बाजूने उभे राहिले. ही हिंमत दाखविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
हे ही वाचा:
तामिळनाडूत युवकाने सापाचाच घेतला चावा; झाली अटक
सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सत्ता आपल्यासाठी एक साधन
सावधान.. देशात २४ तासांत कोरोनाचे ५००० पेक्षा जास्त रुग्ण
कलम ३७० हटल्यानंतर जम्मू काश्मीरच्या बाहेरील १८५ लोकांनी केली जमीन खरेदी
आपल्या पदाचा राजीनामा देताना अनिल यांनी ट्विट केले होते की, काँग्रेसमधील केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डिजिटल मीडिया व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन्सचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून जबाबदाऱ्या सोडण्याची आता योग्य वेळ आली आहे, असे मला वाटते.
बीबीसीच्या माहितीपटातून जेव्हा २००२च्या गोध्रा दंगलीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी याच्यावर टीका करण्यात आली होती. भारताच्या सार्वभौमत्वाला बीसीसीने धक्का पोहोचविण्याचे काम केले आहे, असे विधान अँटनी यांनी केले. केरळ राज्य काँग्रेसच्या डिजिटल प्रचारयंत्रणेची जबाबदारी अनिल अँटनी सांभाळत होते. राज्य काँग्रेसच्या अनेक शाखांनी या माहितीपटाचे प्रदर्शन विविध ठिकाणी करण्याचे नियोजन केले होते. त्यावेळी अँटनी यांनी हे विधान केले होते.