न भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांची विशेष भेट

न भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांची विशेष भेट

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही’ असे म्हणत नांदेड येथील संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी एक खास भेटवस्तू पाठवली आहे. ही भेट म्हणजे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातली सडलेली पिके आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही पिके मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोघे सध्या तीन दिवसांच्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांना ते भेटी देत आहेत. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. यावेळी हवालदिल झालेले शेतकरी या नेत्यांपुढे आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. तर सरकार काही करत नसल्यामुळे विरोधी पक्षाकडूनच मदतीची अपेक्षा व्यक्त करताना देखील शेतकरी दिसत आहेत.

हे ही वाचा:

…आणि आर्यन खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह अधिकाऱ्यालाही आवरला नाही!

उलट्या मार्गाने जाणाऱ्या १३० दुचाकीस्वारांना पोलिस रोज करताहेत सरळ

शाहरुखपुत्र आर्यन खान क्रूझवर होता हे ‘कन्फर्म’; आठ जणांना घेतले ताब्यात

लोखंडवाला, मुर्गन चाळ हे अमलीपदार्थ तस्करांचे अड्डे!

काल शनिवार, २ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे असताना फडणवीस यांची भेट घेऊन संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सडलेली पिके भेट म्हणून पाठवली आहेत. मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना ही विशेष भेट पाठवत आहोत, यात सोडलेला सोयाबीन, कापसाची बोंडे अशी पिके आहेत. हे पाहून तरी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदत जाहीर करावी अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी देताना दिसत आहेत.

महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याविषयीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने नांदेड येथील शेतकऱ्यांनी सडलेली कापसाची बोंडं, फुटवे फुटलेला ऊस, कुजलेला सोयाबीन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवला.” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version