ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या चाचण्या केल्या असत्या काही ब्लॉकेज आढळल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
उद्धव ठाकरेंच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी चाचण्या केल्या गेल्या. यासाठी ते मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात या रुग्णालयात पोहचले होते. रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळल्याने उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
हे ही वाचा :
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठास ‘रतन टाटां’चे नाव!
खर्गेंकडून जमीन परत करणे म्हणजे भ्रष्टाचाराची कबुली!
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या एअर इंडियासह इंडिगोच्या दोन विमानांना बॉम्बची धमकी
बाबा सिद्दीकीच्या हत्येतील आरोपी अल्पवयीन नाही!
उद्धव ठाकरे यांच्यावर एच एन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. उद्धव यांची आज सकाळी आठ वाजल्यापासून एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी डॉक्टरांकडून केली जात होती. या तपासणी दरम्यान ब्लॉकेज आढळून आल्यानंतर अँजिओग्राफीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओप्लास्टी झाल्याचं सांगण्यात आले. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यावर २०१२ मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.