गडकरींचा एक फोन आणि महाराष्ट्राला मिळाले ३०० व्हेंटिलेटर

गडकरींचा एक फोन आणि महाराष्ट्राला मिळाले ३०० व्हेंटिलेटर

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्राला आंध्र प्रदेशाकडून ३०० व्हेंटिलेटर मिळणार आहेत. नितीन गडकरी यांनी ट्वीटरवरून ही माहीती दिली आहे.

महाराष्ट्रात सध्या कोविडचा विस्फोट झाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. राज्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स यांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांना महाराष्ट्राला व्हेंटिलेटर पुरवण्याची विनंती केली होती. रेड्डी यांनी ही विनंती मान्य करून महाराष्ट्राला तब्बल ३०० व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे.

हे ही वाचा:

ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा थेट जर्मनीहून

…आणि पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल

पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!

हवाई मार्गाने ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यास केंद्राची परवानगी

याबद्दल ट्वीट करून माहिती देताना नितीन गडकरी यांनी रेड्डी यांचे आभार देखील मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये एका विनंतीला मान देऊन आंध्र प्रदेश सरकारने ३०० व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. या काठिण काळात लोकांचे जीव वाचवायला हे फार महत्त्वाचे आहे. राज्यातील सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांच्या सुलभ कामाबद्दल आभार मानतो.

नितीन गडकरी यांनी यापूर्वी देखील नागपूरातील एका कोविड सेंटरचे उद्घाटन केले होते. त्याबरोबरच नितीन गडकरी यांनी एका ऑक्सिजन मिळवून देण्यात देखील महत्त्वाची भूमिका निभावली होती.

Exit mobile version