मोदी निंदा करणाऱ्या सोरेनना जगन मोहननी झापले

मोदी निंदा करणाऱ्या सोरेनना जगन मोहननी झापले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निंदा करणाऱ्या उत्तरेतल्या मुख्यमंत्र्यांना थेट दक्षिणेतून चपराक बसली आहे. ट्विटरवरून मोदींची निंदा करणाऱ्या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी झापले आहे.

देशात सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दर दिवशी देशातील लाखो नागरिक या कोविडच्या विळख्यात येत आहेत तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशात केंद्र सरकार आणि सर्वच राज्य सरकारे यांनी समन्वयातुन काम करणे अपेक्षित आहे. पण तरी या परिस्थितीतही अनेक गोष्टींचे राजकारण करत केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्याचे काम अनेक राज्यांकडून केले जात आहे. गुरुवारी अशीच एक गोष्ट समोर आली.

हे ही वाचा:

“पवार साहेबांचे अदृश्य हात, अजित पवारांचे चोख नियोजन”

वाझे आणि काझीच्या कोठडीत वाढ

कुख्यात डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू

“अनिल परब आणतात माझ्या कामात बाधा”

झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी ट्विट करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लक्ष केले. आदरणीय पंतप्रधान मोदी यांचा आज फोन आला होता. पण त्यांनी फक्त ‘मन की बात’ केली, जर ‘काम की बात’ केली असती तर बरे झाले असते असे सोरेन यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी सोरेन यांच्या या ट्विटला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “प्रिय हेमंत सोरेन, मला तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे. मी एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपल्यात कितीही मतभेद असले, तरी अशा पद्धतीचे राजकारण करणे आपल्याला राष्ट्र म्हणून कमजोर करेल. कोवीड विरुद्धच्या या युद्धात ही वेळ एकमेकांकडे बोटे दाखवायची नसून, एकत्र येऊन पंतप्रधानांचे हात बळकट करण्याची आहे जेणेकरून आपण प्रभावीपणे या महामारीचा सामना करू शकू.” असे ट्विट करत जगन मोहन रेड्डी यांनी सोरेन यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Exit mobile version