आंध्र, कर्नाटकने ऑक्सिजन उचलला, ठाकरे सरकारची फक्त तोंडपाटीलकी

आंध्र, कर्नाटकने ऑक्सिजन उचलला, ठाकरे सरकारची फक्त तोंडपाटीलकी

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असताना, सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. अशावेळी ओडिशा सारख्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा होत असताना, महाराष्ट्र सरकारने हा वेळच्यावेळी महाराष्ट्रात आणण्यामधेही अकार्यक्षमता दाखवली आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळत आहे. यावरूनच भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“ओदिशा राज्याकडून मिळणारा ऑक्सिजन आंध्र, कर्नाटक राज्यांनी तातडीने उचलला. ठाकरे सरकार तोंडपाटीलकी करण्यात मश्गूल असल्यामुळे त्यांना अजून वेळ मिळाला नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकांची सोय बड्या हॉस्पिटलमध्ये होतेय ना, जनता तडफडून मेली तर काय फरक पडतो, अशी ही नीच मानसिकता.” असे ट्विट अतुल भातखळकरांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने नागपूरसाठी ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. रायपूर येथून हा ऑक्सिजन नागपूरला आणण्यात आला आहे. शनिवार, २४ एप्रिल रोजी हा ऑक्सिजन नागपूरला पोहोचला. हा ऑक्सिजन नागपूर मधील कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.

हे ही वाचा:

३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती- सेरो सर्वे

कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोविशील्डनंतर कोवॅक्सीनचीही किंमत जाहीर

कठीण समय येता रशिया कामास येतो?

देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दर दिवशी लाखो नागरिक या कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. याचा देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता भासत आहे. कुठे रुग्णांना बेड्स नाहीयेत तर कुठे रेमडेसिवीर उपलब्ध होत नाहीयेत. देशभरात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचीही कमतरता भासत आहे. अशातच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Exit mobile version